Every Sunrise is fulfillment of an
Eternal Dharma....We may fail to see its glory...
पृथ्वीचे तिच्या मुलांना पत्र.....
तुमचे पिता जे
शाश्वत, अनंत व सर्व शक्तिशाली आहेत,
त्यांना कधीच तुम्हाला असे बघायचे नव्हते. लक्षात घ्या तो जो पूर्ण विश्वाचा
निर्माण व निर्वाह करता आहे तो सुध्हा तुमच्या एवढा व्यस्त नाही. या गोष्टिचा
पुन्हा नक्की विचार करा.
का म्हणून तुम्ही
सगळेच ओझे स्वताच्या डोक्यावर लादून घेतले आहे?
का तुम्ही तुमच्याच
सारख्यानचा नाश करता?? का बरे तुम्ही क्रोध करता??
तुम्ही आठवा माझ्या
लाड़क्याँनो मी तुम्हाला आज पर्यंत फ़क्त भरण-पोषण आणि प्रेम एवढेच दिलेले आहे.
कधीतरी तुम्ही माझ्या आत्म-चैतन्याशी एकरूप होउन बघितल आहे का? जर तुम्ही तसे करू शकला असतात तर तुम्ही कधीच एवढे तनाव ग्रस्त व असहाय्य झाला नसतात.
तुमच्या जवळ अजुनही वेळ आहे माझ्या आत्म्याशी एकरूप व्हा जो तुमचा सुद्धा आत्मा आहे आणि त्याचेच प्रतिबिम्ब सगाळ्यानमध्ये बघा, सगळे तुमचेच बहिन- भाऊ आहेत.

When Man Walls Himself from Nature,
When He Stops Listening to The Heartbeat of Mother Nature, Calamities Takes Place...
माझ्या लाड्क्यानो, माझ्या शरीरात
नद्या, सरोवरे, सागर, पर्वत सामावलेले
आहेत,
जे जीवनाची अभिव्यक्ति आहे, लक्षण आहे. या सगळ्यान मध्ये एकच आत्मा आहे. कधीही हा
विचार करू नका की तुमच्या घराबाहेराचे झाड़ हे तुमच्या पेक्षा वेगळे आहे.
तुमचा टाकलेला 'उश्वास' (आपानवायु) हा त्या झाडा साठी 'श्वास' आहे आणि त्यांचा
उश्वास (प्राणवायु) हा तुमच्या साठी
'श्वास' आहे. हा गूढ़ सहयोग, हे दृढ़ नाते आणि प्रेम तुम्ही बघू शकता की नाहि ?? तुम्ही वृक्षांशी, झाडांशी, फुलांशी आणि निसर्गाशी अतुटपने जुळलेले आहात. तुमचे अस्तित्व, तुमचे जीवन या सगळ्यानशी जुळलेले आहे. का तुम्ही स्वताला त्यांच्या पासून वेगळे करीत आहत? का तुम्ही झाडांना नष्ट करीत आहात?
ते पण तुमच्याच
अस्तित्वाचा एक भाग आहेत. जर तुम्ही हे शाश्वत,
अनमोल बंधन तोडून टाकले तर
तुम्ही श्वास कसा घेणार?? माझ्या मुलांनो,
तुम्ही जीवनाचे चक्र तोडत आहात, त्यामध्ये बाधा
आणित आहात, कृपया असे करू नका...
माझ्या लाड्क्यानो, तुमचे जीवन तेजोमय
आहे, तुम्ही अगदी तुमच्या पित्या समान आहात. ते
बुद्धिमान आहेत, प्रकाशमान आहेत,
शक्तिशाली आहेत. ते सर्वतः पूर्णपणे भव्य आहेत आणि कधीच कुठल्याही दुर्बळतेला बळी पडत नाहीत.
तुम्ही पण त्यांच्या सारखेच आहात.. त्यांनी पूर्ण विश्वाची
निर्मिती धर्माच्या आधारावर केलि आहे. जीवन-धर्माच्या आधारावर..
जसे वृक्ष आणि तुमचे एक गूढ़ नाते आहे,
त्यामुले तुम्हाला शुद्ध हवा मिलते, तसेच सींह आणि वाघ
यासारखे मांसाहारी प्राणी पण हरिनांची व इतर शकाहारी प्राण्यांची
संख्या काबूत ठेवन्याचे काम करतात. या पद्धतीने सगळेच प्राणीमात्र हा
निसर्गधर्मं व्यवस्थित चालावा
यासाठी काहीना काही तरी हातभार लावतात. हा धर्मं कधीच भंग व्हायला नको, हा धर्म असाच चालायला हवा नेहमीसाठी सतत....कारण जीवन-धर्मं
हा शाश्वत आहे, निरंतर आहे,
अनंत आहे.
धर्मं - तुमच्या पित्याचीच अभिव्यक्ती आहे. आपण सगळे त्यातच जीवन जगत असतो, आपले जीवन त्याशिवाय काहीच नाही. तुम्ही कधी वाघ किंवा सींहला स्वताच्या आनंदासाठी, मनोरंजना साठी कुणाला मारतांना बघितले आहे का?? कधी तुम्ही पक्ष्यांना दिवस उजाड़ल्या नंतर घरट्यात आळश्या सारखे, टवाळकी करीत बसलेले बघितले आहे का ?? कितीतरी युग झालीत, कधीतरी सुर्याला सुट्टी घेतांना तुम्ही बघितले आहे का? जीवन - मरणाच्या निसर्ग व्यवस्थापनेत कधी काही बदल झालेला तुम्ही बघितला आहे का?? निसर्ग नीयमा नुसार जो जन्म घेतो त्याला मृत्यु येतोच ....

Mind Poses Conflicts. Conflicts
create Stress. Ego Reins. Liberation Slips Past...
स्व:ताच्या
इन्द्रिय सुखासाठी, क्रोधामुळे,
वासनेमुळे किंवा घृणा वृत्तीने कुणाला मारने,
जिव घेणे हे धर्माच्या विरुद्ध आहे.
यामूळे तुमचेच अधःपतन
होत आहे. जेव्हा तुम्ही दुसरयाना पीड़ा
देता, दुख देता, तेव्हा तश्याच
प्रकारचे दु:ख तुमच्या जीवनात पण वारंवार
पीछा करते, हा पण धर्माचाच एक भाग आहे. तुमच्याच
पैकी कुणीतरी "थेओरी ऑफ़ रिलेटिविटी- सापेक्षतावादाचा सिधांत"
लिहिलेला आहे, ते पण धर्माचेच
एक स्वरुप आहे, निदान हा सिधांत वाचल्यामुळे तरी तुमच्या सायंसचे गुणगान करणारया मनावर
काहीतरी परिणाम होईल. माझ्या मुलांनो,
तुम्ही या गोष्टीची खबरदारी घ्यायला हवी
की सायंसच्या अभ्यासामुळे तुम्ही असंवेदनशील किंवा अधिक
संवेदनाशून्य तर होत चालले नाहीत ना??
माझ्या या बोलण्याला काहीतरी आधार आहे, तुमच्या प्रयोगशाळेत रोज कितीतरी प्राण्यांना यातना देऊन देऊन
मारल्या जाते. ही लज्जास्पद गोष्ट आहे बार का. कुठल्याही जिवाची यातना देऊन
हत्या करने म्हणजे अतिशय वाईट कृत्य आहे व त्यामुळे जे कर्म तुमच्या
खात्यात जमा होतात त्यामुळे तुम्हाला भविष्यात अतिशय दु:ख आणि यातना भोगाव्या
लागतील.
कर्म ही एक शृंखला आहे,
एक बंधन आहे जे तुम्हाला पुनः -पुनः शरीर धारण करण्यास
म्हणजेच पुनः जन्म घेण्यास भाग पाडते व जे दु:ख आणि यातना तुम्ही दुसरयाना
दिल्यात, त्याच तुम्हाला सुद्धा भोगाव्या लागतात. तुम्ही या जन्मात भोगत असले भोग हे कधीतरी तुमच्याच केलेल्या
कृतींचे मूळ असते. कुणावरही केलेल्या अत्याचाराचे फळ हे नक्की भोगावेच लागते.
परन्तु जर
निसर्गाने धर्मं पालनासाठी तुमचा उपयोग करुन घेतला तर ते तुमचे कर्म बनत नहीं. जसे की जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या
नकळत जर काही मुंग्या मेल्या तर ते त्यांचे भाग्य असते तुमचे जानिवपुर्वक
केलेले कर्म नसते. जर अश्या अजानिवातेने किंवा कुठलाही उद्देश न ठेवता
केलेल्या कृति मुळे तुमच्या मनामध्ये जर अपराधाची भावना येत असेल तर मग ते
वेगळेच समीकरण बनते, तेव्हा मात्र तुम्ही न केलेल्या कर्माच्या बन्धनात उगिचच
अडकले जाता. जर निसर्ग काहि कारना निमित्त तुम्हाला उपकरण बनवून तुमचा
उपयोग करुन घेत असेल तर तो तुमचा धर्मं असतो,
कर्म नव्हे. म्हणून त्याबद्दल काळजी करू नका.
कर्म हे शिक्षाभिमुख किंवा फक्त दंड देणारे नसते, कर्म हे जबाबदारी भिमुख, कृतिभिमुख असते. जानिवपुर्वकपणे केलेल्या तुमच्या प्रत्येक कृत्याला तुम्ही जबाबदार आहत, यामध्ये तुमच्या विचारांचा, तुमच्या शब्दांचा आणि तुमच्या प्रत्येक कृतीचा समावेश होतो.
माझ्या लाड्क्यानो, तुमच्या शरीरात बहुतांश टक्के पानी आहे. पानी हे पवित्र आहे सगळेच पंचभूत/मुलद्रव्य पवित्र आहेत. पानी, हवा, अग्नि, आकाश आणि भूमि हे पंचमहाभूत फार पुरातन आहेत. कारण त्यांची निर्मिती तुमच्या पित्या पासून झालेली आहे, त्या परमेश्वरा पासून. सगळेच काहि त्या शुद्ध चैतन्यापसून निर्माण झालेले आहे. तुम्ही प्रत्येक पदार्थामागे असलेल्या त्या शुद्ध चैतन्यशी जुळने फार आवश्यक आहे. म्हणून पाण्याचा आदर करा, पानी वाचवा, पानी साठवा, पाण्याबद्दल संवेदनशील व्हा. तुम्हाला सुद्दृढ राहण्यासाठी, शुद्ध पाण्याची आवशकता असते. नदीचे पानी एकेकाळी एवढे शुद्ध असायचे की तुमचे पूर्वज वाहत्या नदीचे पानी पिउनही, नेहमी सुद्दृढ राहायचे. तुम्ही ते आता करू शकता का? आता जर तुम्ही एखाद्या शेजारच्या नदितले पानी प्यायालात तर तुम्ही आजारी पड़ाल. जगातील सर्व नद्यांचे पानी तुम्ही अशुद्ध व दूषित करुन टाकले आहे, तुम्ही महासगारांनाही दूषित करू शकता.

माझ्या प्रिय
मुलांनो, तुमचे अजागरूकपणे वागणे व जगने तुमच्याचसाठी हानिकारक झाले आहे,
धोक्याचे झाले आहे. तुमचे जीवन नदयांशी
आणि पाण्याशी जुळलेले आहे,
तुमचे त्यांच्याशी खुप दृढ़ नाते आहे, तुम्ही का त्यांना विषारी करता आहात?
वाहत्या नदीशी तुमचे खुप जवळचे नाते आहे, तुमचे जीवनही
असेच वाहात असते आणि काळहि असाच वाहात
असतो. नदी कड़े बघून तुम्ही धडा घ्या
की न थम्बता, कुठेही न अडकता, अनुराग न ठेवता, निस्वार्थपने पुढे
पुढे कसे जायचे, कसे वाहात राहायचे. नदी कधीही कुठेच थांबत नाही, अडकत नाही चांगले मनोरम दृश्य असो की वाईट दृश्य असो ती तशीच वाहात राहाते.
सुंदरतेच्या मोहातही अडकत नाही किंवा वाईट घटना बघून दु:ख ही करीत बसत
नाही. तुमचे जीवनही असेच आहे. नदी कडून खुप शिकण्या सारखे आहे तुम्हाला.
अत्यंत महत्वाचे म्हणजे,
तिचा निस्वार्थ स्वभाव, जो तुमच्या
पित्याचापन सत्य-नित्य स्वभाव आहे.
We cannot help but wonder at the
beauty of creation from an atom to the universe...
माझ्या लडक्यान्नो
तुम्ही इथे फ़क्त पाहुणे आहात, तुमची मालकी
कश्यावरच नाही, तुमच्या
स्व:ताच्या मालकीचे असे काहीच नाही इथे. फक्त एकच मालक आहे इथे आणि
तो म्हणजे सर्वशक्तिमान, परमात्मा परमेश्वर. सगळेच त्याच्या पासून
बनलेले आहे व सगळे त्याच्याच मालकीचे आहे. त्याच्या पासुनच सगळे निर्माण होते
व अंततः त्याच्यामध्येच पुन्हा विरूनही जाते. जेव्हाही कधी त्याला वाटले
तेव्हा तो हे सगळे नाटक, हा सगळा खेळ संपवु शकतो.
परन्तु मला सांगा तुम्ही का म्हणून एवढे उत्तेजित झाला आहात, एवढे क्षुब्द झाला आहत?? का म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टनचा एवढा विरोध करता, प्रतिकार करता ?? तुम्हाला तर जगाच्या निर्मितिबद्दल किंवा विश्वाच्या निर्मिती बद्दल काहीही माहिती नाही आहे तरीही का तुम्ही स्व:ताच्याच मनाचा निर्धार करुन सगळे काही बदलण्याचा पाठीमागे लागला आहत?? आणि काय बदलू शकता तुम्ही? जेव्हा की तुम्हाला तुमच्याच जिवनातील घटनांचे कारण ही जानता येत नाही, त्यांचा ठाव-ठिकानाही लावता येत नाही नसते. मग तुम्ही काय बदलायल निघाला आहात?? जर तुम्हाला वाटते की तुम्ही खुप शक्तिशाली आहात, तर मला सांगा तुम्ही तुमच्या हृदयाची धड़कन बदलवू शकता का? तुम्ही तुमचे रक्तासंचालन बदलू शकता का, किंवा काहीतरी नविन प्रयोग म्हणूनच त्याची दिशा बदलवू शकता का ?? तुम्ही तुमचे खाने, पानी पिने बंद करू शकता का?? काय बदलवू शकता?? फ़क्त एक गोष्ट ते म्हणजे तुमचे अन्तरंग, तुमचे आतले जग. तुमचे अंतकरण तुम्ही क्रोध, मोह, लोभ रूपी विषाच्या ऐवजी चांगुलापनाने, भलेपनाने, सत्वाने भरु शकता. त्यामुळे तुमचे बह्यारंग म्हणजे बाहेरचे जगपण अधिक सुन्दर आणि सात्विक दिसु लागेल. एवढे तर तुम्ही तुमच्या साठी करुच शकता ना?

लक्षात घ्या की
तुमच्या पित्याने तुम्हाला, तुमचे स्वताचे अंतकरण समजुन घेण्याची बुद्धि व
त्या ईश्वराला जाणून घेण्याची सदसद्विवेक बुद्धि दिलेली आहे, भुतलावारिल
कुठल्याही दुसरया जिवाला ही क्षमता लाभलेली नाही. तरीही का म्हणून तुम्ही
तुमच्यापेक्षा निम्न जिवांसाराखे वागता??
Salutes to the Lord Sri Krishna –
The Great Environmentalist, who created the Eco-Awareness during
that Era -5000 years ago.
तुम्ही तर त्या
परमेश्वराच्या स्वभावाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. भेद-भाव न करता, संपूर्ण प्रेम
दिले पाहिजे. तो पूर्ण आहे, सदैव संपूर्ण आहे.
तुम्ही वस्तूंचे विभाजन करुन, त्यांना सुक्ष्म
बनविले आहे. तुम्ही स्वताला
खुप सिमित बनविले आहे, सिमित जाणले आणि
पाहिले सुद्धा आहे. पण तो सर्वथः
सर्वतोपरिने अनंत आहे. तुमच्या पित्याला
तुम्ही निवडलेल्या या सिमितपना
बद्दल नेहमीच आश्चर्य वाटते. पण ते कधीही हस्तक्षेप करीत नाहीत. ते तुमचे जीवन तुमच्यावर सोडून
देतात्त. त्यांना विश्वास आहे आणि भरोसा आहे की एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या
अमर्यादित स्वरुपाची जाणीव होईल आणि तुम्ही त्यांच्या कड़े परत जाल. ते तुमची वाट
बघत आहेत. त्यांना खुप आनंद होतो जेव्हाही तुम्ही त्यांचे स्वार्थहिन, दयामय स्वरुप व्यक्त करता आणि सगल्यांवर निस्वार्थ प्रेम
करता. ते फार दु:खी होतात जेव्हा तुम्ही क्रोध, द्वेष सारख्या
नकारात्मक भावना व्यक्त करता आणि जेव्हा तुम्ही एखाद्या मुर्ख, अविकसित, स्थलीय
जिवाप्रमाने विकार, भोग-वासनांना बळी
पड़ता तेव्हा ते फार व्यथित होतात. तुम्ही नेहमी निस्वार्थ प्रेम व्यक्त करुन त्यांना आनंदी ठेवा. तुमच्या
लक्षात येईल की तुमच्यात किती बदल होत चाललाय ते.
माझ्या मुलांनो, तुमची आणि माझी कर्मगती (भाग्य) एकच आहे. तुमचे भाग्य माझ्याशी जुळलेले आहे व माझे तुमच्याशी. आपण एकमेकांपासून वेगळे नाही. तुम्ही ज्यापासून निर्माण झालात त्या मूळ तत्वालाच तुम्ही दूषित करता तेव्हा त्याची प्रतिक्रिया होणे हे अत्यंत स्वाभविक आहे. ही माझी इच्छा नाही आहे, ही नियति आहे! हे माझे दैव आहे आणि तुमचे पण. आणि तेच माझ्या आजारपनाला कारनिभुत ठरले आहे. तुम्ही ज्य़ा पण विपत्ति, संकट, विनाश माझ्या भूस्थलावर बघता त्या सगळ्या अनिवार्य आहेत कारण आता मी थकले आहे, आजारी झाले आहे. तुमची आई आता गंभीरपणे आजारी झाली आहे. वर्षानुवर्षे माझ्या शरीरात विषाचा मारा झाल्यामुळे, माझे शारीर आता विषमय झाले आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमचेच आधुनिकपण माझ्या जिवावर बेतले आहे ते?? जर मी दु:खाचा एक उसासा टाकला तर तुम्हाला वादळ, प्रलय आणि पुर अनुभवावा लागतो, मी विवश होउन सगळे बघते,काहीच मदत करु शकत नाही मी तुमची...माझ्या मुलांनो तुम्ही माझ्यापासून जन्म घेतलात, तुम्ही माझेच आहात. मी वर्षानुवर्षे कितीतरी शरीराना, जिवांना जन्म देत असते कितीतरी गोष्टी सहन करीत असते परन्तु आता मी थकले आहे. आता माझा पुनर्जन्म होण्याची वेळ आलेली आहे.

Selfless Service Purifies us
Immensely
In the Mad World of Pretensions, Who
consider the tears of Helplessness of a poor boy?
If we cannot see the tears of our
fellow beings, how can we ever see the invisible God???
जे माझ्या चेतनेशी
एकरूप झालेले आहेत, माझ्या आत्म्याशी जुळलेले आहेत (जो सपूर्ण जिवित्वाचा
आत्मा आहे), ज्यांना चांगले आणि वाईट याची जाणीव आहे, ते कितीही बदल झालातरी जगतील,
त्यांच्या जीवनावर परिवर्तानाचा काहीही
परिणाम होणार नाही.
तुमच्या पैकी खुपजन अजुनही मन, बुद्धि व भोग-भावना मध्येच मग्न आहेत, त्यांना लवकरच कधीतरी असहनीय वास्तविकतेचा सामना करावा लागेल. मी तुम्हाला आताच सावध करते आहे, मग मला बोलू नका की मी तुम्हाला धोक्याची सूचना दिली नाही म्हणून. वेळ असतानाच सावध व्हा. स्वताचा बचाव करा. जागरूक व्हा.

परिवर्तन हे
नकारात्मक नसते, ते अनिवार्य असते. बदल म्हणजेच उत्क्रांति, विकास. तुमच्या
पित्याने बनवलेल्या या रचनेत काहीच सदैव एकसारखे राहात नाही. गतिशीलता
आणि परिवर्तन हाच तर या रचनचा मूलमंत्र आहे. हे विश्व भुताकाळातही
एकसारखे नव्हते व भविश्यातही हे एकसारखे राहणार नाही. गतिशीलता व बदल जर नसता तर तुम्ही इथे राहिलेच नसता.
माझ्या मुलांनो, प्रत्येक गोष्टीला एक चेतना म्हणून बघा, कारण सगळेच त्या एक दिव्य चेतने पासून आलेले आहेत व सर्व एकच चेतनरूप आहेत.
माझ्या मुलांनो, प्रत्येक गोष्टीला एक चेतना म्हणून बघा, कारण सगळेच त्या एक दिव्य चेतने पासून आलेले आहेत व सर्व एकच चेतनरूप आहेत.
मृत्युची कळजी करू नका. मृत्यु हा अंत नाही. इथे कशालाच अंत नाही. जीवन ही एक उत्क्रांति आहे, निरंतर विकास आहे, निरंतर परिवर्तन आहे. ते कधीच थांबत नाही, यासाठी काळजी करायची काहीच गरज नाही.
Save Our Mother Earth- Sustain the Natural Resources
माझ्या मुलांनो, स्वतावर दया करा व तुमच्या सभोवताल असलेल्या सगाळ्यानवर पण दया करा.
माझे आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आहेत. मी तुमच्यावर प्रेम करते. जरी
तुम्ही मला समजुन घेतले नाही तरी सतत मी तुमच्यावर प्रेमच करीत आले आहे, माझ्या चेतनेला तुम्ही जाणले नाही,
ओळखले नाही तरी. खुप काला पासून मी वाट
बघते आहे की तूम्हाला जाणीव येईल,
कधीतरी तुम्हाला समजदारी येईल याची.
माझ्या जवळ आता फार कमी जीवनकाळ उरलेला आहे. मी निघून जाण्याच्या आधी मला
तुम्हाला हे सांगायचे आहे की मी तुमच्या सगाळ्यानवर एकसारखेच प्रेम
करते. माझ्यासाठी
कुणीच खुप आवडते किंवा नावाडाते नाही.
तुमचे पिता पण या संपूर्ण रचनेवर, संपूर्ण सृष्टिवर एकसारखेच प्रेम करतात, निस्वार्थ प्रेम
करतात.
तुम्ही डोळे बंद करुन ही जाणीव करू शकता. काहि क्षण डोळे बंद करा व तुमच्या हृदयात आम्हाला अनुभवा, स्व:तामध्ये आमच्या चेतनेचा अनुभव करा, तुमच्या आत्म्याला आमच्या आत्म्याशी एकरूप होऊ द्या मग तुम्हाला उमगेल, तुम्हाला जाणीव होईल ह्या परम आणि गूढ़ सत्याची.

When Human Evolves Into the Subtlety That Creates Him/Her, He Knows GOD....
अनंत प्रेम, निरंतर प्रेम...
तुमची आई,
पृथ्वी माता
पृथ्वी माता

No comments:
Post a Comment