Sunday, January 13, 2019

श्री गजाननाची किमया....

श्री गजानन, जय गजानन !!

श्री  गजानन महाराज व माझा जीवन प्रवास  -

भाग १ 

मी स्वाती भूषण घुमरे,आता सध्या (2018 पासून) मी व भार्गवी माझी लेक, आम्ही चिंचवड़- पुणे इथे राहतो। मी जिओमेट्रिक्स रोबोट्स कंपनीत एडमिन मैनेजर व  ऑपरेशन्स कोऑर्डीनेटर  या पदावर काम करते - आल ऑपरेशन्स,इंपोर्ट/एक्सपोर्ट व प्रोक्यूर्मेंट सांभालते।

पूर्वाश्रमातील कु. स्वाती बबनराव ढोमणे। आम्ही तीन भावंड, मोठा दादा व आम्ही दोन बहिणी, परिस्थिति साधारणच। माझे बाबा श्री बबनराव देवराव ढोमणे, आर्मी मधे होते व नंतर सिविल जॉब, त्यामुळे नेहमीच ट्रांसफर होत असायची, अगदी लहान होतो तेव्हा आम्ही रामटेकला (माझे आजोळ) तिथे राहायला होतो। तेव्हापासून मला आध्यात्म्याची आवड लागली. लहानपणा पासून मी बघितले आमच्याकडे गजानन महाराजांची भक्ती होती, माझी आई, सौ. निर्मला ढोमणे, नावाप्रमाणेच निर्मळ व प्रेमळ; श्री गजानन महाराजांची पूजा करायची,पोथी वाचायची। तिच्या मुळेच मला श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण झाली. अगदी इयत्ता सहावित -सातवित असतांना मी परायणला सुरुवात केलि ते आज पावेतो जसे जमेल तसे परायण करते (जागतिक पारायण ग्रुप  - शशिकांत दादा पोकळेंच्या ग्रुप मधे सहभागी आहे ).  
लहान पणापासून  काहीही झाले तरी (परीक्षा असो की काही संकट येवो ) आम्हाला एकच सहारा माहिती होता तो म्हणजे - श्री गजानन महाराज.  
मला अजूनही लहानपणीची ती रात्र आठवते, मी आठवी - नववीत असेन, आमच्या कड़े जीजी (आईची आत्या) आली होती, त्यावेळी आम्ही मच्छरदानी लावायचो। जीजी मच्छरदानित झोपायला गेली व अचनाक लाइन गेली म्हणून बाबा तिच्या पलंगाच्या कोपऱ्यात ठेवलेला टॉर्च घेण्यासाठी उठले, मच्छरदानी लावली असल्यामुळे बाबांनी भिंतीच्या कडेने जावून टॉर्च घेण्यासाठी हात पुरविला व टॉर्च घेवुन वळुन यायला निघाले तर अग आई ग - बाबांचा आर्त किंकाळी ऐकु आली, आमच्या सर्वांच्या काळजात धस्स झाल. काय झाले हो? आई म्हणाली "डोळ्याला खीळा लागला ग, डोळा फुटला बहुतेक।बाबांचे शब्द ऐकून आई म्हणाली - हे देवा, गजानना, हे काय झाले अन्धारात भलतेच ??  तेवढ्यात लाइन आली व बाबांचा रक्त बंबाळ डोळा बघुन आईला तर भोवळच आली, बहिन रडायला लागली. पण मी मात्र खंबीर होते,  मला विश्वास होता गजाननावर ते अस काही होवू देणार नाहीत। मी बाबांना एका खुर्चीवर बसवल, बहिनीला आई साठी पाणी आणायला सांगितल व मी धाव घेतली देवघरा कड़े "गजानना प्लीज बाबांच्या डोळ्याला कहिहि होवू देवू नकोस आमच्या साठी प्रथम वैद्य आजही गजाननच आहेत। मी अंगारा घेवुन आले व आधी बाबांना लावला। बाबांंच्या डोळयाचे रक्त पुसले, पाणी  दिले। रात्रि दवाख़ानेही बंद असतात म्हणून आई व जीजी चिंता ग्रस्त दिसत होत्या। थोड्यावेळाने रक्त थांबले म्हणून बाबांनी जरा डोळा उघडून बघितला तर काय आच्छर्य  बाबांना  त्या डोळ्याने दिसत होते। सगळी माझ्या गजाननाची कृपा। त्यारात्री जे मलम घरी होते टेक लावून बाबा झोपले व दुसऱ्या  दिवशी डॉक्टरला दाखविले, डॉक्टर पण अचंबित झाले की, पापनी फाटून आत भुभुळाला पण मार लागला होता तरी डोळा मात्र शाबूत होता। हा चमत्कार फक्त माझा गजाननच करू शकतो। आम्ही सगळ्यांनी अगदी मनापासुन त्यांचे आभार मानले व त्या वयात मी दाखविलेल्या हिम्मती बद्दल जीजीने मनभरुन माझे कौतुक केले पण 'तो विश्वास, ती हिम्मत" मला माझ्या गजानन भक्ति मुळेच तर मिळाली होती हे तेवढेच खरे .....

भाग २

वरील घटनेमुळे माझा गजाननावरचा विश्वास अजुन पक्का झाला होता। दहावित शाळेतुन पहिली यावी ही माझी व घरच्यांची इच्छा होती व तसा अभ्यास ही मी केला होता। परीक्षेतील कॉपी करने हा प्रकार मला अजिबात आवडत नाही परंतु भरपूर लोक कॉपी करतात। परीक्षा सुरु झाली सेंटर जरी आमच्या शाळेतच मिळाले होते। पण दुसऱ्या शाळेच्या कॉपी करनारया मुलांचा पण नंबर आमच्याच शाशालेट होता।  माझ्या मागचा मुलगा कॉपी करतोय हे माझ्या लक्षात आले होते।  मला कॉपी कारणाऱ्यांचा राग येतो, त्यामुळे मी माझ्या मागच्या मुलाला कॉपी करू नकोस नाहीतर नाव सांगेन अशी धमकी पण दिली। त्याला राग आला असावा। साइंसचा  पेपर होता व माझा आवडीचा विषय असल्यामुळे अभ्यास पूर्ण झाला होता।  पेपर हातात आल्या बरोबर मी गजाननाला नमन करून पेपर लिहायला सुरुवात केलि मधे मधे कॉपी करणाऱ्या मुळे लक्ष विचलित व्हायचे पण मी परत एकाग्र होवून लिहायचे।  मधेच कॉपी तपासन्यासाठी टीम आली व् माझ्या मागे असणाऱ्या मुलाने बदला घ्यायचा म्हणून, त्याच्या जवळची कॉपी पेपर बोळा करून मुददामून माझ्या टेबल खाली टाकला। मी या गोष्टीपासून अनभिज्ञ पेपर लिहिण्यात मग्न होते, तेवढ्यात ते सर माझ्याजवळ येवून उभे रहिले व माझ्या हातातील उत्तरपत्रिका हिसकून स्टैंडप म्हणाले, मला वाटले माझी कही चूक झाली असावी म्हणून मी काय झाले सर विचारले तर ते टेबल खाली बोट दाखवुन म्हणाले - कॉपी करता व काय झाल विचरता, मी मागे बघितले तर तो मुलगा खुन्नस ने माझ्याकडे बघत होता. मनात धस्स झाल (कारन त्यावेळी रेस्टीकेट होने म्हणजे मोठी मान हानि वाटायची चांगल्या घरच्या लोकांना) अंगाचा थरकाप उडाला पण मी ठामपणे म्हंटल ती कॉपी माझी नाहीये, मी कॉपी करत नाही। त्यांनी तो  पेपर चा बोळा उचलायला लावला व् त्यात जे लिहिले होते ते माझ्या पपरमधे शोधु लागले, मी धास्तावले होते पण मनात गजाननाचा अखंड धावा सुरु होता। बराच वेळ तय प्रोसेस मधे गेला शेवटी  ते इंस्पेक्टर एका टीचर ला म्हणाले की ही कॉपी इचि वाटत नाही कारण ह्या मुलीचे उत्तर यामधील उत्तरापेक्षा खुप वेगळे आहे.  २० मिनीटानी मी परत लिहायला सुरुवात केली। खुप वेळ फुकट वाया गेला होता। तरी पेपर भराभर सोडवला पण जो विषय पैकी तो पैकी घेण्याचा होता त्यातच ऐसे विघ्न आले होते, आता मी पहिली येणार की नाही यात थोड़ी शंका होती पण श्री गजाननाच्या कृपेने फर्स्ट क्लास मधे पास ही झाले व शाळेतून पहिलीही आले। अश्या पद्धतीने वेळोवेळी गजानन महाराज आम्हाला साथ देत होते. 
परीक्षा संपली व मी ठरवलेले परायण सुरु केले - त्यात डॉक्टर कवर यांची महाराजांना जेवू घालण्याची इच्छा महाराजांनी कशी पुरवली - ती गोष्ट  मनात घर करून बसली। माझ्याही मनात  एक विचार आला की, मी पण तुमची भक्त आहे, माझा नैवेद्य ग्रहण करायला पण तुम्ही याल ना? आतून विश्वास होता -महाराज नक्की येतील। गुरवारी परायण समाप्ति होती आईने भाकरी -झुनका, शिरा केला व मी वाचायला बसले मनात द्वंद सुरू होते तुम्ही नक्की येणार ना, यावेच लागेल। कसे यायचे, कुठल्या रुपात यायचे ते तुम्ही ठरवा पण या नक्की। मी वाट बघते तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही हे ठरले।  अध्याय झाला आरती झाली पुष्पांजलि नैवेद्य सगळ झाल तरी कुणीच आल नाही। मी आईला विचारले आई अजुन गजानन महाराज आले कसे नाहीत ग ?? आई म्हणाली कदाचित आपण तेवढे पुण्यवान नसू ; जाउ दे  तुझी श्रद्धा आहे ना त्यांच्यावर तेवढेच खुप आहे तू जेवुन  घे। असे म्हणुन आईने ताट वाढायला घेतलित। माझ्या मनाची मात्र घालमेल सुरु झाली, डोळ्यातुन अश्रू वाहायला लागलेत माझ्या भक्तित शक्तिच नाही असे वाटायला लागले, खूपच पोरक झाल्या सारख वाटत होत, अश्रु थांबत नव्हते।  तेवढ्यात दारातुन हाक ऐकू आली - कुणी आहे का घरी ?? अश्रु पुसत मी दाराकडे धावले; मला मनात संकेत मिळाला होता  की, तुझे गजानन महाराज आले आहे बघ....
खरच दारात पांढरे शुभ्र धोतर, पांढरा सदरा व डोक्यावर छान मखमली टोपी घालून गोरे-गोरे अण्णा उभे होते (आईचे मामा) मी खुप खुश झाले, माझ्यासाठी  माझे गजानन महाराज त्यांच्या रुपात आले होते, माझा हट्ट पुरवायला। माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी त्यांचे पाय धुतले, त्यांचा हात धरुन त्यांना पाटावर बसविले, कपाळाला गंध लावले व प्रेमाने जेवायला वाढले माझ्या डोळ्यात आता आनंदाश्रु होते। जेवणा नंतर त्यांनी मला एक संकट काळी म्हणण्याचा मंत्र दिला व आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवुन निघुन गेले. काहीही खबर नसतांना अचानक अण्णा आजोबा त्याच दिवशी, त्याच वेळेस कसे आलेत व त्यांनी मला एक गुरु मंत्र ही दिला हे सगळे एक गूढ़च आहे - हे घरच्यांना जरी अगदी नार्मल वाटले तरी माझे अंतर्मन मला सांगत होते की मामा आजोबांच्या रुपात माझे श्री गजानन महाराज माझा बाल हट्ट पुरवून गेलेत।  जय गुरूदेव दत्त।

भाग ३

पुढे जीवनात त्यांच्या कृपेच्या अश्या छोट्या छोट्या अनेक गोष्टी घडल्या, आम्ही मोठे झालो, आमची परिस्थिति साधारण च होती (मिड्लक्लास). १९९९ चा काळ माझ्या बहिणीच्या तृप्तीच्या लग्नाच्या वेळी घडलेली घटना सांगण्यासारखी आहे. मी एमएससी  करीत होते व बहिन  MA करत होती, लग्नाचा कही विचार केला नव्हता पण अचानक अकोल्याचे पाहुणे तृप्ति ला बघायला आलेत, ते पाहुणे आले तेव्हा दादा (सिविल इंजिनियर) व बाबा ऑफिस मधे होते व आम्ही दोघी कॉलेजमधे. तृप्ति ला कॉलेजमधून बोलावून घेतले. अजय रमेश क्षिरसागर - मुलगा पुण्यात 'भारत फोर्ज' ला मेकेनिकल इंजीनियर होता, वडील MSEB ला क्लास-वन ऑफिसर होते। स्थळ चांगले होते, आमची तृप्ति पण खुप सुंदर होती, त्यांनी तृप्तिला बघितले व लग्न इच्याशीच करेन असे सांगून मुलगा पुण्याला निघून गेला  पण आम्ही कुणीच मुलाला नीट बघितले नाहीं की बोललो सुद्धा नव्हतो । मुलगा सोडुन बाकी सगळे लोक दुसऱ्याच आठवड्यात लग्न पक्क करायला आलेत, आम्ही नाइलाजा ने हो तर बोललो पण मुलगा नेमका कसा हे बघन्या साठी दादाचे पुण्याला जायचे ठरले. दादा व माझा आतेभाऊ ऋषी निघाले पुण्याला। सगळ व्यवस्थित असेल तर येतांना शेगांवला गजानन महाराजांचे दर्शन घेवून ये आईने सांगितले. हे लोक पुण्याला पोहोचले दादा अजयरावांना भेटला, बोलला, त्यांचा स्वाभाव -वागणुक सगळ सगळ अगदीच  छान होत. त्यांच्या सोबत एक दिवस घालवुन हे दुसऱ्यादिवशी तिथुन निघनार तर ऋषि ची तब्येत  बिघडली त्याला डॉक्टर कड़े न्यावे लागले, शहर असल्यामुळे दादाचे भरपूर पैसे तिथे खर्च झाले  नंतर त्याचे औषध घेवून  कसेबसे शेगांव चे  टिकिट काढून हे लोक शेगांव ला निघाले। ऋषीच्या तब्येतीत कही सुधारणा दिसत नव्हती, त्याचा तापहि वाढला होता दादाला खुप काळजी वाटु लागली आता आपल्याकडे पैसे ही नाहीत शेगांव ते नागपुर दोघांचे टिकिट व याची तब्येत जर अशीच राहिली तर याला डॉ कड़े पण न्यावे  लागेल, जेवण, राहणे, डॉक्टरचा  खर्च व टिकिट  हे सगळ एवढ्याशा रूपयात कसे होणार या काळजीने दादा बिच्चारा त्रस्त झाला होता। 
ऋषीचा ताप वाढून त्याची शुद्ध हरपल्यासारखी झाली तेव्हा मात्र दादा घाबरला शेगाव जवळ होते पण दादा च्या डोळ्याला धारा लागल्या होत्या। शेगांव स्टेशन आले दादाने कसे बसे ऋषिला उतरवले व ऑटो त बसवून मंदिराकडे निघाला। त्याला एका देवळा बाहेरच्या बाकड्यावर बसवून त्याने दर्शन घेतले (तेव्हा आता सारखी एवढी गर्दी नसायची व देवळात डायरेक्ट एंट्री असायची) व बाहेर येवून विचार करत होता की आता काय व कसे करू डोळ्यात अश्रु आणून दादा उभा होता। तेवढ्यात एका गृहस्थाने दादाच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाला 'काय झाले बाळा? कसली चिंता करतोस?? दादाने  वळुन बघितले तर तर बाबांच्या वायचे एक ऊंच रुबाबदार व्यक्ति मागे उभे होते। पुढे ते म्हणाले "तुझ्या भावाला बऱ नाही ना ?? कुठे आहे तो ?? तुझ्या जवळ पैसे नाहीत का?? घाबरू नकोस मी मदत करेन तुला।" दादाला रडुच कोसळले, तुम्ही कोण? तुम्हाला कसे माहिती?? दादा ने विचारले, ते म्हणाले - शांत हो आधी , मी तुझ्यासोबत प्रवासात होतो, बघत होतो तुझी घालमेल। चल पहिले आपण त्याला डॉक्टर कड़े नेऊयात।  त्या व्यक्तिने ऋषिला एडमिट केले, औषधे घेवून दिलेत।  दादाला जेवू घातले, डॉक्टर शी बोलुन दुसऱ्या दिवशीचे नागपूरचे २ टिकिट काढून दिले व दादाच्या खिश्यात काही पैसे पण दिलेत खर्चाला । दादा म्हणाला - तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही, तुम्ही कुठे राहाता, नाव काय, मला तुमचा पत्ता दया, मी तुमचे पैसे नक्की परत करेन। त्यावर ते बोलले - " अरे जर अडचणीच्या वेळी माणसाला मदत करायची नाही तर मैग कधी करायची। " 
आणि काळजी करू नकोस गजानन महाराजांच्या दर्शनाला आलाय ना। मग सगळ्या चिंता तोच वाहील ना । असे म्हणून ते म्हणाले मी आचार्य, पुण्याला राहतो, आलास की ये भेटायला। काळजी घे, जय गजानन ! एवढे बोलुन गेलेत ते नंतर परत कधीच भेटले नाहीत (पुण्याला गेल्यावर शहानिशा करण्यासाठी दादाने आचार्यांची चौकशी केलि पण ते सापडले नाहीत) .. ते आमचे गजानन महाराजच होते.. दादाने महाराजांना नमस्कार केला व घरी येवून सम्पूर्ण घटना सांगितली तेव्हा आमची पण खात्री पटली की ते गजानन महाराजच होते,  मि.आचार्यांच्या रुपात येऊन त्यांनीच दादा ला मदत केलि होती। मी दादा ला म्हटले दादा तू किती कित्ती लकी आहेस रे स्वता गजानन महाराजांनी फीजिकली येवून तुझी मदत केलि। स्वयं श्री गजानन महाराज - हीच आमच्या भक्तितली शक्ति होती। तृप्तीचे लग्न व्यवस्थित पार पडले , एक वर्षाने दादाचेही लग्न झाले।

भाग ४

मला पुण्यात जॉब मिळाला व मी पण पुण्यात राहु लागले। मी नेहमी गजानन महाराजांना विचारायचे की तुम्ही  फिजिकली आमच्या सोबत का नाहीत, तुम्ही फिजिकल गुरु बनुन आमच्या समोर का येत नाहीत ?? आताच्या काळात खऱ्या गुरुंची खुप गरज आहे मग तुम्ही कधी येणार सांगा ना?? या ना माझ्या साठी पुन्हा एकदा गजानना  या न प्लीज .. आणि खरच माझ्या गजाननाने माझी इच्छा पूर्ण केलि फिजिकल खरा खुरा गुरु - माझे सद्गुरु मला लाभलेत। याची जन्मी याची देहि मला माझे गुरु मिळालेत।  
२००४ सालची गोष्ट, श्री श्री रविशंकर गुरूजी पुण्यात येणार होते, त्यांचे खुप मोठे सत्संग होते। मला त्यांच्या बद्दल काहीच माहिती नसल्यामुळे मी सत्संग ला जायला तयार नव्हते पण म्हणतात ना गुरु आपल्या शिष्याला शोधून काढतो व साधना -सत्संगाच्या मार्गावर आणतो तसे झाले, माझी एक मैत्रीण मला खेचून घेवून गेली, सत्संग सुरू होते, तेवढ्यात श्री श्री आलेत, मी त्यांना बघितले व त्या क्षणा पासुन माझे जीवन पूर्णतः बदलले मी माझे रहिलेच नव्हते। शरीर होते संसारात व माझा आत्मा गुरूचरणी पोहोचला होता। .. शेवटी सांसारिक रीती रिवाज हे शरीराचे च ना... मला माझेच अश्रु आवरत नव्हते कळतच नव्हते मी का रडतेय व आतून आवाज येत होता "तू ज्या  गुरुच्या शोधात होतिस ना, तो हाच तुझा गुरु।"  माझ्या गजानना जवळ जे मागितल होत ते मला आज मिळाल होत, जीवनतला सगळ्यात बहुमूल्य ठेवा  - माझा गुरु!! 
गजाननाने मला माझा खरा खुरा चालता बोलता गुरु मला दिला होता। तेव्हापासून मी गुरुजीनचीच झाले।  गुरुमार्गावर आल्यावर मी थांबले नाही, सगळे साधना कोर्सेस केलेत, साधना -सेवा -सत्संग हेच माझे जीवन बनले, माझे सत्व खुप वाढले, माझ्या गुरुने पण माझ्यावर भरभरून प्रेम केले प्रत्येक वेळी मला साथ दिली, माझ्या इच्छा बोलायच्या आधीच पूर्ण व्ह्यायला लागल्यात। पण आता संसार नको, लग्न नको ऐसे वाटत असतांना - लग्न झाले - तो  पण  गुरु आदेश समजून मी पाळला व लग्न करून UAE मधे गेले  (फॉरेन च नवरा मिळाला होता )  नवरा दिसायला साधा दिसत असला तरी ३६ च्या आकड्यात होता माझ्यापेक्षा एकदम विरूद्ध होता, मी पुअर वेज, तो नॉनवेज खाणारा, आध्यात्म्याची -ज्ञानाची अजिबात ओढ़ नसलेला 'मेरे मुर्गी की एक टांग करीत' जगणाऱ्यान सारखा। 
खुप खुप विचारांति  मला उमगले की माझ्या साधना मार्गावरुन  मी दूर जाऊ नये संसारात मग्न होवून रमन जावून सतसंगांची साथ सोडू नये म्हणून हा  घाट होता। . शेवटी माझ्या साठी उत्तम काय ते माझ्या पेक्षा माझ्या गुरुलाच ठावूक असणार -  माझे मागच्या संचित कमी होण्यासाठी च हे लग्न झाले असावे असे समजून मी शांतपणे सत्संगाच्या मस्तीत व एका विलक्षण धुंदीत जगत होते.. 
२००५ पासून UAE इथे खुप इंटरनेशनल आर्ट ऑफ़ लिविंग फैकल्टी बनून खुप सेवा कार्य केले... खुप सेवा प्रोजेक्ट्स केलेत। गुरुजींच्याच कृपेने अमेरिकन कंपनीत चांगला मोठा जॉब ही मिळाला। माझे गुरुदेव मला भरभरून साथ देत होते, काही गोष्टींमुळे माझे मागचे कर्म पण माइनस होत होते। गुरुने दाखविलेल्या मार्गावर चालत  मी  पुढे जात होते, गुरूकृपेने ज्ञान - साधना खुपच  डीप होत चालली होती माझी .. माझे अध्यात्म ज्ञान - साधने मुळे  खुप अशक्य गोष्टी शक्य होत  होत्या...माझा ऑरा अधिक-अधिक क्लीन व तेजोमय होत चालला होता।  गुरुच्याच कृपेने श्रीलंका, मलेशिया, ओमान, UAE, असे पर-राष्ट्रभ्रमण पण झाले होते। गुरुजींच्याच कृपेने दादाला पण अबूधाबीला ऑइल फिल्ड मधे कंस्ट्रक्शन इंजिनियर चा जॉब मिळाला। त्यामुळे आई - बाबा, वहिनी, दादाचा मुलगा पिनाक हे सगळे UAE भ्रमणाला  येवून गेलेत। ऑक्टोबर २०११ मध्ये गुरुपूजा कोर्स अटेंड करायला मी UAE  हुन बैंगलोर आश्रम ला गेले होते। तीथे माझ्या वाढ दिवसाच्या दिवशी (१७ Oct ) मला गुरुपूजा पण्डित होण्याचा मान मिळाला। ..."दि  बेस्ट गिफ्ट ऑफ माय बर्थडे एव्हर"


भाग ५

गुरुजींच्या कृपेने २०१२ मधे  कैलाश ला जाण्याचा योग आला व मी जाण्यास सज्ज झाले। तिथे मला खुप विलक्षण  दैवी अनुभव आलेत -
- मानस सरोवराच्या किनाऱ्यावर एका धर्मशाळेत आम्ही थांबलो होतो।  तिथे रात्रि तिथे रात्रि देवी-देवता आंघोळीला येतात व प्रकाशझोत दिसतो असे ऐकले होते। त्या रात्रि मी म्हंटले गजानना माझी पण तो दैवी व विलक्षण प्रकाशझोत बघण्याची इच्छा पुर्ण कर व झोपले। एवढे थकले असून मला रात्रि २ वाजता जाग आली व मी एकटीच बाहेर अंगणात आले सहजच नजर मानस कड़े गेली आणि मी एकटक त्या शांत- सुंदर मानस कड़े बघत राहिले, थोड्या वेळाने पाण्यात कुणीतरी उडी मारल्यावर पाणी उड़त तसा आवाज आला व खरच एक चांदण्यां सारखा प्रकाशझोत खाली मानस मधे उतरतांना दिसला। माझ्या डोळ्यांचे पारणे च फीटले। ..  
- नंतर पहिल्याच प्रदक्षिणेच्या दिवशी अति उस्तुकतेने (पुढील वातावरण व् संकटांपासून अनभिज्ञ मी ) ठरविले की मी पायी च प्रदक्षिणा करणार घोड्यावर बसणार नाही, यमद्वारा जवळ  ग्रुप लीडर ने परत विचारले - 'स्वाती विल यू बी अबल टू वॉक??  आर यु शुअर  यु डोंट नीड हॉर्स। मी 'यस' बोलले व अति आनंदाने पायी चालणाऱ्यांसोबत चालायला सुरुवात केलि।पायी चालणारे आम्ही फ़क्त ५-६ लोक होतो त्यापैकी एक नवराबायको कपल होत त्यांनी उशीरा सुरुवात केली। मी व दिल्ली कॉलेज टीम आम्ही हातात काठ्या घेवुन, अगदी लाइट वेट बैग खांद्यावर घेवून आमच्या प्रदक्षिणेला सुरुवात केलि आणि काही किलोमीटर चालल्यावर माझ्या लक्षात आले की  ते  ३ कॉलेज तरुण-तरुणी व् माझ्यात बरेच अंतर वाढत चालले होते मी तेवढ्या स्पीड ने  चालुच शकत नव्हते। कैलाश वर आधीच ऑक्सीजनची  कमी असते त्यामुळे धाप लागते वरुन ठंडी व चढ़ाव; शरीर एवढ जड़ वाटायला लागत की  पाय खुप दुःखतात व् एक -एक पाउल टाकायला एफर्ट्स घ्यावे लागतात । कही वेळ गेल्यावर मला जणवले की सगळे खुप पुढे निघून गेले होते व मी त्या सम्पूर्ण व्ह्याली मध्ये  एकटीच होते माझ्या उजवीकडे कैलाश शिखर होते व डावीकडे मंद पणे, दगडांमधून खळखळुन वाहणारी बर्फाळ पाण्याची नदी, ऊंच सखल पाउल वाट व नदीचा मंद खळखळाट सोडल्यास फ़क्त स्वताच्याच श्वासाचा आवाज येईल अशी नीरव शांतता । क्षणभर मी घाबरले नंतर विचार केला आपण संसारात नाही कैलाश मधे आहोत स्वयम शिव भोलेनाथांच्या कुशीत मग घाबरण्यासारखे काय त्यात कुणीच नसले तरी प्रत्येक श्वासात, हृदयात व इथल्या कणकणात ईश्वर तर आहेच। देव माझी परीक्षा बघतोय, नो प्रॉब्लेम - मग परत हिम्मत करून चालायला सुरुवात केलि, दूर दूर पर्यन्त फ़क्त विशाल पर्वत रांगा, नदी, दगडी खिंडीचा रस्ता व मी... देवाचे नाव घेत, थोडासा ही वेगळा आवाज आला की दचकत, एक एक पाउल मी पुढे टाकीत होते तेवढ्यात कुणीतरी सोबत चालल्याचा भास झाला बघितले तर  एक ऊंच, लाइट ब्रॉउन कलर चा कुत्रा माझ्या सोबत सोबत चालत होता, मी त्याला न घाबरता विचारले काय रे मला सोबत द्यायला आलास का ?? त्याने माझ्याकडे बघितल व परत चालायला लागला।  त्या सुनसान व्ह्यालित मला मात्र त्याचा आधार वाटला, कधी ४ पावल पुढे तर कधी मागे असा तो मला सोबत करीत होता जणू गुरुदेव दत्तात्रयांनींच त्याला मी एकटी, थकलेली दिसली म्हणून माझ्या सोबत राहायला सांगितले होते. काही  अंतर चालल्यावर  मी खुप थकले, पाय खूपच दुखायला लागले, मी खंडू ला म्हटले - माझी बैग खुप जड़ वाटायला लागली रे तू धरतोस का जरा वेळ। थोड्याच  वेळाने एक घोडेस्वार आला व माझी हालत बघून म्हणाला 'बहन कुछ मदत करू क्या' मी त्याला म्हंटल भैया ये मेरा बैग बहोत भारी लग रहा है, मै इसको लेके नही चल सकती; प्लीज़ आप इसे ले जाके मेरे कैंप में छोड़ दीजिये.... तो म्हणाला 'अभी बहोत चलना है, आप को भूख -प्यास लगी तो??"  मी कमरेच्या पाउच मधे थोड़े ड्रायफ्रुइट्स व छोटी बोटल ठेवली व् बैग त्याला देवून टाकली मनात जरासुद्धा शंका आली  नव्हती की हा माणुस माझी बैग पोहोचवेल की नाही।। त्यावेळी माझे मन खरच मेडिटेटिव झाले होते, शून्यावस्थेत गेले होते (नो रैंडम थॉट्स) फ़क्त शुन्य, कैलाश प्रदक्षिणा माझ्यासाठी एक मेडिटेशन होते जणू ; फ़क्त हळु हळू श्वास सुरू होता व नामस्मरण सुरु होते, कसे तरी शरीर ओढ़त होते मी.. तेवढ्यात देवाच्या परीक्षेचा कहरच झाला आभाळ  काळ्या -काळ्या ढगांनी आच्छादले गेले, त्या अंधारलेल्या दरित मलाआणखीनच भीति वाटायला लागली तरी मनात म्हटले अजुन कठिन परीक्षा घेतोय का?? डोळे  भरून आले - काही  चुक झाली का देवा माझी गजानना, गुरुदेवा ??  तेवढ्यात एकाएकी मोठ्या -मोठ्या थेंबांचा पाऊस सुरु झाला व् बघता बघता थेंबांचे रूपांतर गारां मध्ये झाले।। आधीच चालने कठिन झाले होते वरुन हा गारांचा पाऊस। आई ग.... मी कैलाश शिखरा कड़े बघितले व माझ्या हिम्मतीचा बांध च फुटला - मी लहान मुला सारखी जोर जोरात रडायला लागले, पुढचे मागचे काहीच दिसत नव्हते, तो सोबतचा खंडु पण गायब झाला होता। मी फ़क्त शिव तत्व अंगी होते म्हणून उभी होते। ... मग मात्र मी सखा भाव आणून देवाशी भांडायला सुरुवात केली -' देवा शिवा, गजानना  मी ऐकले होते की तू तुझ्या भक्तांची मदत करतोस,मग का येत  नाहीस माझ्या मदतीला। खऱ्या भक्तांची तू परीक्षा पण बघतोस पण एवढी परीक्षा बघु नकोस की माझा प्राणांत जवळ येईल आणि शम्भू देवा तुला शंका वाटतेय का माझ्या भक्ती बद्दल?? अरे माझ्या गजाननाला विचार ना?? तू तर भक्तांना साथ देतोस ना, मदत करतोस ना ?? मग आता का धावून येत नाहीस ? हेच का तुझ भक्तांवरील प्रेम??  तुला भक्तांचा रक्षणकर्ता, तारणहार, पालनकर्ता, जगन्माता, माउली म्हणतात ना? मग जगन्माता आपल्या लेकराला अशी वाऱ्यावर सोडून देते का?? रडतांना बघुन ही धावत येत नाहीस तू का?? शक्ति माता पण तुझ्या सोबत आहे ना? तिला तरी पाठव...एवढ्या लांबून तुला भेटायला आले तर तू साथ द्यायची सोडून असा बघत बसलाय।।। जा कट्टी तुझ्याशी, आता तु हे सगळ थांबविल्या शिवाय व कुणीतरी मला सोबत दिल्या शिवाय मी एकहि पाउल पुढे चालणारच नाही.. एवढे बोलून रडतच मी एका दगड़ा वर बसले। दुसऱ्या क्षणी पाऊस थांबला व रस्ता दिसू लागला तरी मी उठले नाही माझ्या शरीरात त्राणच नव्हता..पाय प्रचंड दुखत होते, पोट रिकामे होते। त्या वातावरणात काही खायची इच्छाच होत नाही, जातच नाही काही। त्यातल्या त्यात जे घडले त्यामुळे प्राण शक्ती कमी झाली होती... एका क्षणाला तर वाटले होते की मी इथेच प्राण सोडते की काय? 
संध्या देवींच्या आगमनाची वेळ होत होती , सूर्य देव अस्तास चालले होते, थोड्या वेळाने पूर्ण व्ह्याली अंधाराने भरून जाणार होती पण मी मात्र न घाबरता, माझा देव मला नक्की साथ देणार या दृढ़ विश्वासाने तशीच त्याच्या मदतीची  वाट बघत बसले होते आणि माझा विश्वास बघुन माझ्या देवाने स्वयं शक्ति मातेलाच माझ्या सोबतीला पाठवले। ५ मिनिटाने मला पुढचे दोन दगड सोडून पलीकडे एक तिबेटी बाई बसलेली दिसली, माझ्या आईच्या वयाची असेल ती, खूपच प्रेमळ चेहरा होता तिचा, जणू गुरुमाऊलीच बसली होती स्वयं।  तिने खूनेनी मला जवळ बोलविले, तिला बघून मला धीर आला व उठून चालत मी तिच्या जवळ गेले।  तिने मला खुनेनेच सांगितले की माझे ही पाय दुःखतात आहेत, काही आहे का ?? मला वाटले खायला मागते आहे म्हणून मी तिला ड्रायफ्रूट्स दिलेत, तिने मलाही खायला सांगितले , मी पण दोन-तीन  दाने तोंडात टाकले, थोड़ पाणी प्यायले तेव्हा मला जरा शक्ति मिळाली। मग ती माउली म्हणाली  "चला"  आणि मी मुकपणे, यंत्रवत तिच्या मागुन चालु लागले, थकले की बसायचो आम्ही व परत उठून चालायला लगायचो, तिने मला  तिबेटी देव-देऊळ दाखवले, मंत्र सांगितलेत। एकमेकींची भाषा भिन्न असूनहि आमच्या मधे प्रेमळ संवाद सुरु होता, हळु हळू प्रवास सुरु होता। ती मला सोडून पुढे गेली नाही, मी मागे थांबलेली दिसले की ती  पण थांबायची माझ्यासाठी, जसे पुढे जावून आई आपल्या बाळा साठी थांबते तशी, प्रकाशाने तर लगेचच साथ सोडली पण त्या माऊलिने माझी साथ माझ्या कैंप पर्यन्त दिली। जसे काही तिला कुणी सांगितलेच होते - की या लेकराला व्यवस्थित कैंप मधे पोहोचव बर का? 
रात्री ७:३० वाजता आम्ही कैंप मधे पोहोचलो। मी तिला नमस्कार केला, मिठी मारली, माझ्या जवळचे सगळे ड्रायफ्रूट्स, थोड़ा कापुर, एक रुमाल व टेब्लेट्स तिला दिलेत व मला गेट वर निरोप देवून, मला परत एक मीठी मारून ती माउली अंधारात गायब झाली। 
अश्या पद्धतीने माझ्या शिव- शक्ति ने, माझ्या गुरु माऊलिने मला अशी साथ दिली व सांगितले की मी सतत तुझ्या सोबत आहे...  
लकिली परतीच्या वेळी पण मानस सरोवराच्या किनाऱ्यावर थांबण्याचा दुसऱ्यांदा योग आला व अजुन एक दैवी अनुभव घेता आला. पाण्यात डुबकी मारली व सोबत आणलेल्या बाळ कृष्णाला पण पवित्र मानस मधे नाहु घातले, बॉटल्स मधे पवित्र मानस जल घेतले व शेवटचे कैलाश कड़े बघितले त्यावर दॄष्टि स्थीर झाली आणि तीन दिवसांच्या आठवणीने व दैवी अनुभवाने मन भरून आले. मी कैलाश ला नमन करुन म्हटले मला साथ दिलीस, व्यवस्थित प्रदक्षिणा पार पाडलीस त्याबद्दल खुप खुप धन्य झाले मी शिवा पण इथे आल्यावर आपले आराध्य, आपली गुरुमाऊली साक्षात् दर्शन देते असे ऐकले होते मी, मला काही माझ्या गजाननाचे, गुरुदेव दत्तात्रयांचे साक्षात् दर्शन झाले नाही। देवा मी तेवढी पुण्यवान नसेल कदाचित म्हणूनच तर माझ्या बाबतीत तसे घडले नाही. तरीही जे काही दैवी अनुभव दिलेस त्याने मी भरून पावले गुरुदेवा। . त्या रात्री मला स्वप्न दृष्टांत झाला - गजाननाने व दत्त गुरुंनी दर्शन दिले व सांगितले की - मी कैलाश मधेच आहे असे समजु नकोस। तू जिथे आहे - तिथेच मी असतो। मला स्वप्नात ही त्यांना बघून व त्यांनी सांगितलेल्या वचनाने आनंद झाला।


भाग ६

परंतु कैलाश वर स्वप्नात सांगितलेल्या गोष्टीचा दाखला लवकरच परत आल्यावर मिळाला। कैलाश हुन परत आल्यावर मी नागपुरला आईकडे गेले, तर दादा सहज म्हणाला परवा शेगांव ला जायचे का?? सगळ्यांना आनंद झाला।  शेगांव ला जाण्याचा दिवस उगवला, अगदी सकाळीच निघायचे होते। सकाळी माझ्या मनात आले की महाराजांसाठी भाकरी झुणक्याचा प्रसाद घेवुन जावा, ते आज नक्की ग्रहण करतील। मी सहज वहिनीला बोलले ती पण आनंदाने हो म्हणाली व् आम्ही भराभर प्रसाद तयार केला व तूप माखुन भाकरी झुणका, हिरवी मिरची कांदा एका डब्यात भरून त्यावर एक तुलसी पत्र ठेवून पैक केले व निघालो। 
का कुणास ठावूक पण मी दादाला बोलले आज महाराज आपला प्रसाद स्व:ता घेतील बघ। तो ही हो बोलला।
आम्ही देवळात गेलो दर्शन घेतले तेव्हा महाराजांच्या समधिजवळ मी प्रसादाचा डब्बा पुढे केला तर तिथल्या पण्डितांनी प्रसाद घ्यायला चक्क नकार दिला, वर जावून राम मंदिरात दया असे बोलले, मनाला दिलासा दिला काळजी नको राम मंदिरात तुझा प्रसाद स्वीकार करतील। राम मंदिरातले पंडित म्हणाले इथे आम्ही अन्नाचा प्रसाद स्वीकारत नाही तेव्हा मात्र मला व दादाला  खुप दुःख झाले,  डोळ्यात पाणीच आले माझ्या... मी तिथेच ध्यान लावले, गजाननाला नमस्कार करून म्हणाले, मला वाटले होते एवढ्या प्रेमाणे करून आणलेला प्रसाद तुम्ही नक्की स्वीकाराल, तुम्ही तर प्रसादाचा एक तुकडाही स्वीकारला नाहीत व डोळ्यांतुन टपा टाप अश्रु पडायला लागले। तुमच कैलाश ला दिलेल वचन पण खोट ठरल गुरुदेव दत्ता की, "मी कैलाश मधेच आहे असे समजु नकोस, तू जिथे जाशील तिथे मी आहे" एवढे  बोलुन मी वळले तर काय आश्चर्य देवळातच गजानन महाराजांसारखे एक म्हातारे बाबा एक पाय लांब करून, गजानन महाराजांच्या मुद्रेत, भिंतीला टेकून बसले होते, बाजुलाच एक काठी ठेवलेली होती, मी  त्यांच्याकडे बघितले व दादाला बोलले "दादा  बघ गजानन महाराज स्वता प्रसाद घ्यायला देवळात आलेत" बस्स जणू त्याच क्षणी आजु बाजु च सगळ जग स्तब्ध झाल व फ़क्त आम्ही आमच्या साक्षात् गजाननाची मनपूर्वक सेवा करू लागलो, आम्ही त्यांच्या जवळ बसलो नमस्कार केला त्यांच्या पुढयात भाकरी झुणक्याचा व शिरयाचा  प्रसाद ठेवला, मी त्यांचे पाय चेपूण दिले, माझ्या डोळ्यांच्या धारा सतत वाहात होत्या। त्यांना आम्ही थोड़ा प्रसाद भरवला थोड़ा डब्यात दिला। त्यांच्या खिश्यात दक्षिणा ठेवली व मनपूर्वक नमस्कार करून उठलो। त्यानंतर देवळातले सेवक आलेत - उठा माउली चला म्हणायला तोपर्यंत सगळेजण स्तब्ध झाले होते जणू, अन्यथा देवळात जास्त वेळ म्हणजे २ मिनिटही कुणाला बसु देत नाहीत, परन्तु आमची पुजा, सेवा, प्रसाद अर्पण होई पर्यन्त कुणीच आम्हाला टोकलही नाही व उठा चला ही म्हंटले नाही। हि सगळी माझ्या श्री गजानन गुरुंच्या चमत्काराची कमाल... माझ्या गजानन माउलीने  कैलाश मधे दिलेले आपले वचन पाळून आम्हाला दर्शनाचा साक्षात्कार दिला, आम्हाला साक्षात् दर्शन देवून आम्हाला धन्य केले....
जय गजानन श्री गजानन !!

भाग ७

कैलाश यात्रेनंतर दुसऱ्याच वर्षी (२०१३ चा जुलै महिना ) त्याच महिन्यात मला मातृत्वाची चाहुल लागली। .... सतत ९-१० वर्ष सेवा -साधना - सत्संग घडले व लग्नाच्या नवव्या वर्षी माझ्या ईश्वराने न मागता,काहीही डॉक्टरी प्रयत्न न करता मला मातृत्व दिले।
व माझ्या जीवनातील एक नवे वळण सुरु झाले।
मी अमेरिकन कंपनीचा जॉब सोडला व मला सातवा महिना  सुरु असतांना, माझ्या दादासोबत UAE हुन भारतात परत आले।