“लव्ह जिहाद - एक भयान षडयंत्र”
भारतीय सनातन संस्कृती आणि भारतीय कुटुंब पध्दती हि भारताची खरी ताकद आहे. कारण शिव आणि शक्ती यांनी मिळुनच हि सृष्टी तयार झाली आहे. शक्ती हे प्रकृतीचे मूळ आहे, म्हणूनच तिला आदिशक्ती म्हणतात. प्रत्येक स्त्री मध्ये या आदी शक्तीचा अंश असतो, स्त्री हि शक्तीचा स्रोत आहे. Science च्या दृष्टीने बघितले तर आपल्या बॉडी मधल्या प्रत्येक सेल (Cell) मध्ये मायटोकॉंड्रिया (Mitochondria)असतो - ज्याला सेल चे पॉवरहाउस म्हणतात, हा मायटोकॉंड्रिया फक्त नी फक्त आईकडूनच मुलांना मिळतो. पेशीविज्ञान (Cell Biology) आणि अनुवंशशास्त्रातील (Genetics) हे एक अत्यंत महत्त्वाचे सत्य आहे, म्हणजे निसर्गाने पण शक्ती केंद्र एका स्त्रीला म्हणजेच आईला बनवले आहे.
अशी हि स्त्री भारतामध्ये देवी प्रमाणे पूजली जाते, फक्त भारता मधेच स्त्रीला देवीचा दर्जा दिल्या जातो. अधर्मीयांना हे माहिती आहे कि, या पुरातन संस्कृतीला, भारताला तोडायचे असेल तर फक्त स्त्रीला भ्रस्ट,करणे तोडने गरजेचे आहे, २०० वर्षापासून अधर्मी लोक हेच करत आहेत. भारतीय स्त्रीने चुकीचे पाऊल उचलावे म्हणजे, प्रथम ती तुटेल, मग कुटुंब तुटेल, मग संस्कृतीच्या अभावाने आणि कुटुंब विस्कळीत झाल्याने समाज मोडून पडेल, समाज तुटला कि देश मोडेल - हि अधर्मीयांची 'राक्षसी लालसा' आहे, हि लालसा पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप काही चुकीच्या अमानवीय गोष्टींचा अवलंब केला, फेमिनिझम, स्त्री स्वातंत्र्याच्या, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भुसकट नॅरेटिव्हज चा वापर करून भारतीय स्त्री च्या डोक्यात चुकीच्या गोष्टी बिंबवण्यात आल्या, त्यात स्त्री भुरळत गेली, बंडखोरीपणा वाढून चुकीचे पाऊल उचलू लागली.. "लव्ह जिहाद" - हा पण एक गुलाबी मार्ग आहे, युवतींना, स्त्रियांना गोड भुरळ घालुन त्यांचे काम साधून घेण्याचा.
“लव्ह जिहाद” हा एक मोठा धोका आहे, सगळ्यांना माहिती असूनहि, आज हा शब्द राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत वादग्रस्त शब्द बनला आहे …
माध्यमांमध्ये दिसत नसले तरी “लव्ह जिहाद” हा धोका आपल्या घरापर्यंत पोहोचला आहे, हे सत्य समाज अजूनही स्वीकारायला तयार नाही. आता “कॉर्पोरेट जिहाद” सुद्धा समोर येत आहे; TCS - नाशिक हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
२-३ वर्ष झालीत मी या क्षेत्रात काम करतेय.. एखादी केस आली कि, मुलीला सोडवा, तिची कॉउंसिलिंग करा, मग पोलीस स्टेशन, विधी नुसार FIR, POCSO, आई-वडिलांना समजावणे अशा कित्ती गोष्टी सांभाळाव्या लागतात.. पण कामं करतांना लक्षात आले कि खूप मुलींना, ज्या एज्युकेटेड असून माहितीच नसते कि, त्यांच्या सोबत धोका होतोय, आपण कसे फसत जातोय याची त्यांना कल्पना देखील नसते. कधी वाटतं कि मुस्लिम लोक मुलींवर जादू करतात कि काय ?? एकदा त्या तिकडे गेल्या कि, त्यांना आपले विचार पटतच नाहीत, करणी केल्यासारखं त्या कुणाचाच विचार करत नाहीत, आईचा-बाबांचा, ना कुटुंबाचा; बस्स एकच धून रिपीट करतात - "मेरा अब्दुल वैसा नही है, वो बहोत अच्छा है "
स्वप्नाळू मुली सहज प्रेमाच्या जाळ्यात अडकू शकतात, कारण त्यांना प्रेमाचे खूप आकर्षण असते. त्यांना चित्रपट आणि पुस्तकांमधल्या रोमँससारखे नाते अनुभवायचे असते. पुढाकार घेणारा, “मला तू हवी आहेस” असे सांगणारा पुरुष त्यांना आवडतो. त्या संकोचत, हळूहळू नात्यात पुढे जायला इच्छितात. त्यांच्या मनात अनेकदा "मी करते ते योग्य" अशी भावना असते, त्यामुळे त्या धोक्या कडे दुर्लक्ष करतात..
अश्याच अनुभवलेल्या काही मुलींच्या रिसेन्टआणि रियल लव्ह जिहाद स्टोरीज (सत्य घटना २०२४-२०२६):
१. २०२४-२०२५ घटना:
पुणे नासिक रोड वरच्या एका छोट्या गावात राहणारी एकुलती एक थोराव्यांची कन्या - वैशाली थोरवे
सुंदर, गोरी गोमटी, शिक्षणाची आवड, पण अचानक वडिलांचा मृत्यू झाला, आई कामावर जायला लागली. एकत्र कुटुंब असल्याने मोठे चुलत भाऊ, काकू घरी असायच्या. पण वडिलांचे छत्र नसलेली हि मुलगी त्या जिहाद्याच्या नजरेत आली आणि त्याने तिला पटवायचे ठरवले, कासीम शेख हे त्या जिहादीचे नाव. गावातलाच मुलगा असल्याने, त्याचे काही हिंदू मित्र होते जे त्याच्या जिहादी वृत्ती पासून अज्ञात होते, जिहादी ने त्यांची मदत घेऊन तिच्यापर्यंत निरोप दिला कि, ती याला फार आवडते. तिने पहिले जास्त लक्ष दिले नाही पण रोज -रोज तो तिचा कॉलेज पर्यंत पाठलाग करायचा, तीची तारीफ करायचा.. मग ती त्याच्या प्रेमात पडली त्यावेळी ती फक्त १७ वर्षांची होती, भावनिक वय, हळवे विचार, वडील गेल्याने अजून एकटी झालेली, त्याने तिला पूर्ण आपलेसे केले, लग्न करण्याबद्दल तिला पटवून ठेवले आणि तिचे वय १८ होण्याची वाट बघू लागला..
जसे तिचे वय १८ पूर्ण झाले त्याने तिला मुंबईला पळवून नेण्याचा बेत आखला, सकाळी कॉलेजला जाते सांगून वैशाली घरातून पळून गेली, तिला फक्त प्रेम दिसत होते धोका दिसत नव्हता.. कासीम ने तिला मुंबईत नेले तिथे ऑलरेडी सगळा इंतजाम केलेला होताच, मुंबईच्या कुठल्या तरी मस्जिदीत जाऊन त्याने वैशाली सोबत शरियत कानून नुसार लग्न केले, एका रात्रीत तिचे धर्मांतरंन केले, तिचे नाव बदलून खुशबू ठेवले.. आणि धमकी देऊन तो तिचे शारीरिक शोषण करत राहिला, .
इकडे गावात लाडकी बहीण दिसत नाही म्हणून हंगामा झाला संपूर्ण गाव एकत्र आले, तिच्या क्लास मधल्या मुलांकडून आणि मैत्रिणी कडुन कळाले कि ती त्या लांड्या कासीम सोबत पळून गेली आहे म्हणून. मग काय विचारायचे तिचे भाऊ, काका, सगळा गाव, सरपंच साहेब सगळे संतप्त झाले, पोलिसात तक्रार दिली, अपहरणाची केस लावली..पोलिसांनी त्या दोघांना पकडले, मुलाला गजाआड टाकले आणि मुलीला आमच्याकडे आणले..
आली तेव्हा ती खूप रडत होती, तिला काळातच नव्हतं काय झालय, काय करावं ?? मी बघितलेल्या मुलींपैकी वैशाली खूप भोळी होती, गोड होती. मी तिच्याशी मैत्री केली, पाणीपुरी खाऊ घातली, आणि हळू हळू सगली स्टोरी समजली.. मग मी तिला मुस्लिम मेन्टॅलिटी बद्दल सांगितले, स्त्रीकडे ते फक्त भोग वस्तू आणि मुलं काढण्याची मशीन म्हणून बघतात, त्यांच्यात स्त्रीला मान नाही, तिला मशिदीत जाण्याचा पण हक्क नाही. स्त्रीने फक्त मटण, गोमांस शिजवायचे, खाऊ घालायचे आणि नवऱ्याने सांगितले त्या व्यक्ती सोबत झोपायचे, मुले पैदा करायचे. बस्स एवढेच जीवन असते, जीवन काय नरक असतो तो, नो स्टडी, नो करिअर, नो सम्मान.. नंतर तिला केरला स्टोरी बद्दल सांगितले. ती म्हणाली ताई मला हे माहितीच नव्हते कि मुस्लिम असे असतात आणि प्रेमाच्या नावाने जिहाद करतात.. मी यांनतर कधीच त्याच्या कडे जाणार नाही, त्याचे तोंड हि बघणार नाही आणि शिक्षण पूर्ण करून भविष्यात तुम्हाला मदत करेन.. यापेक्षा मोठी दुसरी कोणतीच पावती, सर्टिफिकेट मिळू शकत नाही, जिहाद मध्ये अडकलेली मुलगी तुम्हाला स्वतःहून मदत करेन सांगते.. ते यश, तो आनंद शब्दात सांगता येत नाही..
वैशालीची घरवापसी झाली.. जिहाद्याला अटक झाली, आता आख्खा गाव जागरूक झालाय, सरपंच स्वतः आमच्याशी बोलले, आभार मानले.. अजूनही कधी-कधी वैशाली चा कॉल येतो, माझ्याशी बोलून छान वाटत तिला, आधार वाटतो, मोकळी होते..
२. २०२५ -२०२६ घटना:
मारवाडी समाज म्हंटल कि घुंगट वाल्या महिला, हातात खूप बांगड्या, कपाळावर बिंदी, पायात पैंजण सगळं कसं ट्रेडिशनल. याच समाजातलय ४ पऱ्या लव्ह जिहाद च्या शिकार होता होता वाचल्या.. त्यातल्या एका परी ने खूप काही सहन केलं.
ती परी होती चांदणी माली, कोंढव्याच्या कॉलेजमध्ये ११ व्या वर्गात शिकत होती. घरी आई, लहान बहीण भाऊ आणि वडील, ते व्यवसायात व्यस्त असायचे. मामे भावाचे साडीचे शॉप होते, चांदणी कधी-कधी शॉप मध्ये पण बसायची.. तिच्याच क्लास मध्ये एक शाहीन नावाची मुसलमान मुलगी होती, एक दिवस ती हिच्याशी मैत्री करायला आली, इतर हिंदू मुली तिच्या मैत्रिणी होत्या म्हणून हिने पण मैत्री स्वीकारली, तिथेच चांदणी चुकली.. शाहीन ने काही दिवसांनी कॉलेजच्या बाहेर तिच्या भावाशी, आदाब मोईउद्दीन शहा शी ओळख करून दिली. तिचा भाऊ वयाने त्यांच्यापेक्षा खूप मोठा होता, म्हणून चांदणी जास्त बोली नाही आणि निघून गेली.. शाहीन आणि तिच्या भावाचे डोळ्यात काही इशारे झाले.. आदब ने तिच्या कानात काही सांगितले आणि निघून गेला.. मग इंस्टा वर त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तरी चांदणी विरघळी नाही मग तो रोज तिला तू किती सुंदर आहे हे सांगायला msg पाठवू लागला. शाहीन ला भेटायच्या निमित्ताने येऊन तिच्याकडे बघू लागला, बोलण्याचा प्रयत्न करु लागला, तिच्या ग्लॅहं बहीण भावांबद्दल चौकशी करू लागला, हळू हळू त्यांची मैत्री झालीच. एक दिवस तो म्हणाला माझ्याकडे बाईक आहे चल फिरून येऊ, म्हणून एका दर्ग्यात घेऊन गेला.. ती म्हणाली मी दर्ग्यात येत नाही तर तो म्हणाला इट्स ओके नो प्रॉब्लेम, मी जरा माझ्या आई साठी दवा घेऊन येतो तू बस इथे.. ती बाकड्यावर बसली.. तेवढ्यात एक मुस्लिम महिला तिच्या बाजूला येऊन बसली.. तिला विचारायला लागली, हूर जैसा रूप है तुम्हारा बेटा, कहाँ से आई, किसके साथ?? बोलत बोलत तिने एक चॉकलेट काढले एक तिला दिले एक स्वतः खाल्ले... थोड्याच वेळात चांदणी च डोकं भारी वाटायला लागलं आणि ती बेशुद्ध झाली, तिला जाग आली तेव्हा ती एका लॉज वर, एका रूम मध्ये होती, ती घाबरली आणि प्रश्न विचारायला लागली.. त्याने तिला शांतपणे कुरवाळत म्हंटले चांदणी शांत हो अग तुला भोवळ आली होती, मी खूप विचार केला कि तुला कुठे नेऊ, कुणी बघितले असते तर तुला घराचे ओरडले असते, तुझी इज्जत हि माझी इज्जत.. म्हणून माझ्या मित्राच्या लॉज वर घेऊन आलो. तुला आता बरं वाटतेय का ?? तशी ती त्याला बिलगली तिला वाटले याला मी असाच समजत होते हा किती चांगला आहेस, शिकार मिळाल्यावर एका क्रूर कर्म्याचे डोळे कसे चमकतात तसे आदाबचे डोळे चमकले. इथेच चांदणी गोड जाळ्यात फसली. मग त्याने तिला शरीर काय सुख देऊ शकत ती जाणीव करून दिली.. तिथे कॅमेरे लावलेले होतेच बस्स आदाब च काम झालं.. चांदणी खुश होती कि चांगला, समजदार बॉय फ्रेंड मिळाला.. पण तिला काय माहिती होते कि याचा डाव काय आहे.. त्यानंतर त्याने तिला परत एकदा लॉज वर चालण्यास सांगितले तिने नकार दिला, मामेभावाने बघितले तर रागावेल असे कारण सांगितले, १-२ वेळा नकार दिल्यावर त्याने तिला तिचा अश्लील विडिओ आणि फोटो पाठवले, तू आली नाहीस तर viral करेन अशी धमकी दिली तेव्हा ती तयार झाली, असे वारंवार त्याने तिला धमकी देऊन तिचे शारीरिक शोषन केले आणि तिचे फेक आधार कार्ड पण बनवले..
एक दिवस ती शॉप मध्ये बसली होती त्याने तिला येण्यास रेसांगितले तिने नकार दिला तर तो शॉपमध्ये येऊन भावांना सांगेन बोलला, तिला राग आला तिने फोन पटकला आणि आत गेली तर तिच्या मोठ्या मामे भावाने तिचा फोन चेक केला, तेव्हा त्याला सगळा प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ सगळ्या भावांना बोलावले हिंदू जागरण वाल्यांना कॉल केला..भावांनी त्याला धमकी दिली तर त्याने तिला आणि फॅमिलीला जीवे मारण्याची धमकी दिली ..
सगळे नातेवाईक मिळून त्याला चोप दिला पोलिसांना कळवले, आम्ही तिचे समुपदेशन केले, FIR ची तयारी करून त्याच्यावर रेप, बोगस डॉकूमेंट्स बनवणे, जीवे मारण्याची धमकी आणि अश्या बऱ्याच केसेस लावण्यात आल्या ..
शाहीन चे पण नाव FIR वर चढवले, तिची पण कसून चौकशी झाली, चांदणी ने सांगितले कि अश्या अजून ३ मुलींशी शाहीन मुस्लिम मुलांना भेटवते आहे, त्या सगळ्या मुलींना जागरूक करण्यात आले. चांदणी मुले त्यांचा जीव वाचला. चांदणी चे बाबा तिला हवापालट साठी राजस्थानात घेऊन गेले. अश्याप्रकारे चांदणी ची चांदबीबी होण्यापासून सुटका झाली..
पण अजून अश्या कित्ती शाहीन आणि अब्दुल इतर कॉलेज मध्ये मुलींना फसवत असतील कुणास ठाऊक..
मी अश्या खूप केसेस हॅन्डल केल्या पण त्यात, परत आलेल्या आणि लक्षात राहण्यासारख्या काही अजून केसेस मध्ये एक लग्न झालेली, लहान मुलीची आई, जी IT कंपनीत कामाला होती, दुसारी नर्स जी स्वतःच्या कलिग सोबत फसणार होती पण तिच्या लक्षात आले कि तो मुस्लिम आहे म्हणून वाचली, तिसरी नीट ची तयारी करणारी, वाडिया कॉलेजची नॉर्थ इंडियन मुलगी, जिला जिहाद्यांने पळवून धरमशाला, हिमाचल प्रदेश मध्ये नेले होते, पण तिला पण घरी परत आणण्यामध्ये यश आले आणि आता ती छान शिक्षण घेतेय..
आज समाजात गरज आहे ती आई वडिलांनी मुला-मुलींशी दिलखुलास संवाद ठेवण्याची, मैत्रीचे नाते निर्माण करण्याची. त्यांना जागरूकता, समजदारी, नात्यांचा आदर, सनातन संस्कृतीचा, आदर, प्रेम आणि अभिमान शिकवण्याची.. प्रत्येक आई वडिलांचे हे प्रथम कर्तव्य आहे कि, आपल्या मुला मुलींना आपली संस्कृती, धर्म, शाश्त्र आणि शस्त्र यांचे शिक्षण द्यावे.. आज सनातन हिंदू धर्म शिक्षणाची फार आवशक्यता आहे.. तेव्हाच आपण आपल्या लेकींना आणि बहिणींना वाचवू शकू ...
धन्यवाद
स्वाती घुमरे
हडपसर, पुणे