वाहनांची पूजा व त्या मागचा उद्देश्य - वैज्ञानिक विचार
'अध्यात्म' हा विज्ञानाचा पाया आहे हे खरे आहे.
आपल्या देशात, भारतीय संस्कृति मधे असे किती तरी ग्रंथ आहेत व श्री ज्ञानेश्वर व समर्थ रामदास सारखे योगी-महात्मे- संत आहेत ज्यांनी आपल्या लेखनातून व कृतीतुन हे जगाला पटवून दिले आहे - सम्पूर्ण विश्व हे या पिण्डातच सामवलेले आहे व अध्यात्मातुन - विज्ञान च नाही तर खुप काही साध्य करता येते।
योग/अध्यात्म मार्ग आरंभिला की पिंडातच विश्व सामावून त्यांची संपूर्ण जाणीव व ज्ञान प्राप्त होते आणि
अक्ख विश्व तुमच्या सेवेसाठी तयार असते - काहीही अशक्य नसते....।
पिंड म्हणजे काय तर हा मातीचा गोळा ज्याला आपण "शरीर" म्हणतो।
शरीर- सगळ्यात स्थूल व जड़ लेवल ऑफ़ एक्सिस्टन्स आहे । जे श्वास आहे तोवर जिवंत असते.
प्राण /एनर्जी लेवल वेगळीच तिच्या शिवाय काहीच कार्य होत नाहीत व सगळ्यात महत्वाची व सुक्ष्म लेवल म्हणजे आत्मा।। आपण म्हणतो ना - तुझे शरीर, त्याचे शरीर - हाच तो 'तू,' 'तों , मी ' म्हणजे 'आत्मा'....
ऑटोमोबाइल्स किंवा मशीन म्हणजे तरी काय - मनुष्यने तयार केलेले एक यंत्रच !! पण कोणतेही यंत्र किंवा मशीन एखाद्या पेट्रोलियम पदार्थाशिवाय किंवा बैटरी किंवा इलेक्ट्रिक शिवाय किंवा एयर, किंवा वाटर शिवाय चालत नाही हे तेवढेच खरे.
जसे शरीर चालावे म्हणून आपण जेवण करतो तसे गाड़ी चालवायला पेट्रोल पाहिजेच । जरी आपण गाडी चालवत असलो तरी गाड़ीत पेट्रोल नसले तर गाडी चालेल का??
आता प्रश्न येतो की, पेट्रोल / डिज़ल येत कुठून?? मनुष्याला जे-जे आवश्यक पदार्थ आहेत ते सगळे आपल्याला कोण देत ??
धरती माता - अन्न वस्त्र निवाराच नाही तर पेट्रोलियम, खणिजे, क्रूड आयल, मेटल्स, गोल्ड, सिल्वर , माणिक, मोती हे सगळे फ़क्त धरती माताच आपल्याला देते..
म्हणजे एकंदर आपण
अन्न वस्त्र निवारा शिवाय इतर सगळ्याच गोष्टी साठी - धरती मातेवर म्हणजेच लक्ष्मीमाते वर अवलंबून आहोत।।। सोन्या नाण्या पासून तर गाडीत लागणारे पेट्रोल डीज़ल पण लक्ष्मी माताच आपल्याला देते.....
आता एनर्जी बद्दल बघूयात। एनर्जी म्हणजे शक्ति! शक्ति कशी तयार होते. थर्मोडायनामिक्स च्या नियमप्रमाणे "एनर्जी नेवर गेट
डिस्ट्रॉइड" हे तर माहिती असेलच। मग ती'च तर आहे शक्ति माता - शक्ति माता म्हणजे दुर्गा जी कधीच डिस्ट्रॉय होत नाही व प्रत्येक कार्य करतांना तीची गरज लागतेच। सुप्त रुपाने ती सगळीकडे असतेच पण शक्तीला जागृत करावे लागते एकदा एनर्जी/शक्ति तयार झाली की ती कार्यामधे यूज़ होते।
आपल्या मानवी शरीरात एनर्जी - पाणी व ऑक्सीजन च्या मदतीने जेवनावर क्रिया झाली की शक्ती तयार होते
। ऑटोमोबाइल्स मधे जी शक्ति लागते ती पेट्रोलियम पदार्थांनी तयार होते।
मशीन / गाड़ी हे शक्तीचे प्रतिक आहेत जे लक्ष्मी मातेच्या साथीने चालते। प्रत्येक मशीन, प्रत्येक ऑटोमोबाइल हे शक्तीचे प्रतिक आहे. व प्रत्येक मोटर, गाडीचे ऑटोमोबाइल्स चे डिज़ाइन हे सरस्वतीच्या शिष्याने तयार केलेले असते। म्हणजे सरस्वती मातेचा पण आशीर्वाद आलाच.
आपल्या संस्कृति मधे
दुर्गा माता, लक्ष्मी माता व सरस्वती मातेची पूजा करतात म्हणून आपल्या घरी - ऑफिस - कारखान्यांमधे मशीन्स, ऑटोमोबाइल्स एंड गाड्यांची पूजा करण्याची पद्धत आहे। त्यामागे हे साइंस बेस्ड अध्यात्म आहे - की संपूर्ण जग हे तो परमेश्वर - शिव व माता शक्तीने बनलेले आहे. त्या शिवचेच वेगळे रूप आहेत - ब्रम्ह आणि विष्णु तसेच शक्ति मातेचेच रूप आहेत - लक्ष्मी व सरस्वती।
ज्या वाहनावर आरूढ़ होवून आपण या घाई गर्दीच्या काळात आपल्या कामासाठी बाहेर निघतो। त्या वाहना बद्दल आदर दाखवणे, त्याला नमस्कार करने म्हणजे बूरसट विचार नसुन। त्या शक्ति माते बद्दल आदर दाखवणे आहे जी आपल्याला सुरक्षित प्रवास करवुन, सुखरूप आपल्या डेस्टिनेशन ला पोहोचवते। वाहनाला केलेला नमस्कार व पूजा त्या त्रिदेवींना- दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती ला पोहोचतो . कारण ह्याच त्रिदेवी आपल्याला वाहन (ऑटोमोबाइल), त्यातले इंधन व वाहन चालवण्याची बुद्धि देतात।
म्हणून पूर्वीपासून वाहनांची व मशीन्सची पूजा करन्याची पद्धत आहे - ते आपले संस्कार आहेत ....